citynewsJalgaonLatest NewsMaharashtra

विजेच्या धक्क्याने माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना आईचाही अंत!

जळगावातील आसोदा रोड परिसरातील हृदयद्रावक घटना; घराजवळ पडलेली विद्युत तार बाजूला करताना दुर्घटना

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील आसोदा रोड परिसरात विजेच्या धक्क्याने आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुनंदा सपकाळे आणि राहुल सपकाळे अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. घराजवळ पडलेली विद्युत तार बाजूला करताना मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी आई धावली; मात्र तिलाही विजेचा धक्का बसल्याने दोघांचाही मृत्यू झाला.

मुलाला वाचवण्यासाठी आईची धाव

मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा रोड परिसरातील घराजवळ विद्युत तार पडलेली होती. ही तार बाजूला करण्याच्या प्रयत्नात राहुल सपकाळे यांना विजेचा धक्का बसला. मुलाला विजेचा धक्का बसल्याचे पाहून आई सुनंदा सपकाळे यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, या प्रयत्नात त्यांनाही विजेचा धक्का बसला.

परिसरात हळहळ

या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलगा अशा दोघांचाही मृत्यू झाला. माय-लेकाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. घराजवळ पडलेल्या विद्युत तारेमुळे घडलेल्या या घटनेने विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button