citynewsWashim

दुष्काळातही खटकाळी प्रकल्पातून बेसुमार पाणी उपसा; १० ते १२ मोटारपंप सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

कॅनॉलचे गेट खुले असल्याने पाण्याची नासाडी; उर्वरित साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी

वाशिम | प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत मानोरा तालुक्यातील खटकाळी प्रकल्पातून मात्र मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रकल्पातून तब्बल १० ते १२ वीज मोटारपंपांच्या साहाय्याने अनधिकृतपणे पाणी उपसा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधून वीजपंपाद्वारे पाणी उपशावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र खटकाळी प्रकल्पात या निर्बंधांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे प्रकल्पाच्या कॅनॉलचे गेट बंद नसल्याने पाण्याची नासाडीही होत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे दुष्काळामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसरीकडे प्रकल्पातील पाण्याचा अशा प्रकारे उपसा सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

खटकाळी प्रकल्पातील वीज मोटारपंप तातडीने हटवावेत, कॅनॉलमधून होणारा पाण्याचा प्रवाह बंद करावा आणि प्रकल्पातील उर्वरित पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया :

  • माणिकराव चव्हाण, ग्रामस्थ
  • अजय चव्हाण, शेतकरी
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button