अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला सुरुवात; संगीता शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून मतदान केंद्राची पाहणी; माझा विजय निश्चित, संगीता शिंदे यांचा दावा
अमरावती | सिटी न्यूज
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अमरावती शहरातील विविध मतदान केंद्रांवर शिक्षक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेट देत मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.
आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून मतदान केंद्राची पाहणी
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी मतदान केंद्राची पाहणी करून मतदान अधिकारी आणि शिक्षक मतदारांशी संवाद साधला. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे का, याची त्यांनी माहिती घेतली.
संगीता शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
दरम्यान, भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. माझा विजय निश्चित असून माझा भाऊ नेहमीच माझ्या सोबत आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विविध उमेदवारांचे भवितव्य शिक्षक मतदारांच्या मतदानातून ठरणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
सिटी न्यूज | अमरावती



