अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; आयुक्त नयना गुंडे यांच्याकडून मतदान केंद्राची पाहणी

उर्दू हायस्कूल मतदान केंद्राला भेट; मतदान अधिकारी आणि शिक्षक मतदारांशी साधला संवाद
अमरावती | सिटी न्यूज
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी प्रशासनाकडून विविध मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी अमरावती शहरातील उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच मतदान अधिकारी आणि शिक्षक मतदारांशी संवाद साधून मतदान व्यवस्थेची माहिती जाणून घेतली.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. विभागीय आयुक्तांच्या या भेटीदरम्यान मतदान केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रत्येक घडामोडीसाठी पाहत राहा सिटी न्यूज!
सिटी न्यूज | अमरावती



