citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी ५९.९१ टक्के मतदान

दुपारी २ वाजेपर्यंत ४ हजार १५३ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ | प्रतिनिधी : दुर्गेश कान्हु

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यात आज मतदानाला प्रतिसाद मिळत असून, सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ५९.९१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

उपलब्ध आकडेवारीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ६ हजार ९३२ मतदारांपैकी ४ हजार १५३ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये २ हजार ९४४ पुरुष आणि १ हजार २०९ महिला मतदारांचा समावेश आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी आणि मतदारांचा प्रतिसाद याकडे लक्ष लागले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

सिटी न्यूज | यवतमाळ

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button