citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदान; ६,९३२ मतदार बजावणार हक्क

जिल्ह्यात १८ मतदान केंद्रे; २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त

यवतमाळ | प्रतिनिधी : दुर्गेश कान्हु

ANC : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ६ हजार ९३२ शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, कॅमेरा आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, सर्व पात्र शिक्षक मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सिटी न्यूज | यवतमाळ

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button