BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्रे; तालुक्यात सुमारे १,०६० शिक्षक मतदार

मेहकर | सिटी न्यूज

महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मेहकर येथे आज, शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मेहकर तहसील कार्यालयात मतदानाची व्यवस्था करण्यात आली असून, शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत.

मेहकर तालुक्यात दोन मतदान केंद्रे

मेहकर तालुक्यात जवळपास १ हजार ६० शिक्षक मतदार आहेत. त्यांच्या मतदानासाठी दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

विभागात २६ उमेदवार रिंगणात

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३५ हजार ८१० शिक्षक मतदार असून, २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

शिक्षक मतदार कोणाला पसंती देतात आणि मतमोजणीनंतर कोणाच्या बाजूने कौल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूज | मेहकर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button