citynewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपुरात ड्रग्जविरोधी कारवाईचा गाजावाजा, पण ‘मोठे मासे’ कुठे?

MD ड्रग्जची जप्ती ₹10.32 कोटींवर; प्रकरणांची संख्या 64 वरून 73 — City Newsचा विशेष तपास

नागपूर : नागपुरात ड्रग्जविरोधी कारवाईला वेग आल्याचे चित्र दिसत असले, तरी या कारवाईनंतर एक महत्त्वाचा सवाल उपस्थित होत आहे — छोट्या पेडलर्सवर कारवाई होत असेल, तर ड्रग्जच्या या संपूर्ण नेटवर्कचा मुख्य पुरवठादार आणि सूत्रधार नेमका कुठे आहे?

जानेवारी ते ऑगस्ट 2026 या कालावधीत नागपुरात MD ड्रग्जची जप्ती तब्बल 10 कोटी 32 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. याच काळात MD संबंधित प्रकरणांची संख्या 64 वरून 73 पर्यंत वाढल्याचेही सांगितले जात आहे.

एकीकडे पोलिसांकडून ड्रग्जविरोधात सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. संशयित पेडलर्सना ताब्यात घेणे, MD जप्त करणे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या कारवायांमधून पुढे येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे — या ड्रग्जचा पुरवठा नेमका कोण करत आहे?

नागपुरात MD पोहोचवणाऱ्या नेटवर्कचा माग काढताना तपास आंतरराज्य पातळीवरील पुरवठादारांपर्यंत पोहोचतोय का? या नेटवर्कला आर्थिक रसद कोण पुरवत आहे? ड्रग्जचा माल नागपुरात कुठून येतो आणि शहरातील पेडलर्सपर्यंत तो कोण पोहोचवतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कारण एखाद्या पेडलरला पकडल्याने ड्रग्जचा व्यवहार थांबतोच असे नाही. पुरवठ्याची साखळी आणि त्यामागील मुख्य व्यक्तींपर्यंत तपास पोहोचला, तरच या नेटवर्कच्या मुळावर कारवाई होऊ शकते.

मात्र सध्या उपलब्ध आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर जप्ती वाढतेय, गुन्ह्यांची संख्या वाढतेय; पण या नेटवर्कचा मुख्य पुरवठादार आणि सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला आहे का? हा प्रश्न कायम आहे.

City Newsचा सवाल स्पष्ट आहे —

चिल्लर विक्रेत्यांवर कारवाई होतेय…
पण ड्रग्जचा खरा पुरवठादार कोण?
नागपुरातील MD नेटवर्कचे आंतरराज्य धागे कुठे जोडलेले आहेत?
आणि तपास खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचतोय का?

याच प्रश्नांचा City Newsचा विशेष तपास.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button