AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

विदर्भाच्या राजाची भव्य-दिव्य विसर्जन मिरवणूक!

१३ ढोल-ताशा पथकांचा निनाद, राजकमल चौकात महाआरती; १ ऑक्टोबरला सिटी न्यूजवर थेट प्रक्षेपण

अमरावती : अमरावतीच्या गणेशोत्सवाची शान… हजारो गणेशभक्तांचं श्रद्धास्थान… आणि भक्तांच्या लाडक्या विदर्भाच्या राजाला आता भक्तिभावाने निरोप देण्याची वेळ आली आहे.

न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या विदर्भाच्या राजाची यंदाची विसर्जन मिरवणूक भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तब्बल १३ नामांकित ढोल-ताशा आणि वाद्य पथकांचा निनाद! अमरावतीच्या रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि गणरायाच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय होणार आहे.

या भव्य मिरवणुकीदरम्यान राजकमल चौकात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत होणारी ही महाआरती भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

यानंतर मोसिकोल विसर्जनस्थळी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, तब्बल २ हजार ५०० भाविकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

म्हणजेच यंदाचा विदर्भाच्या राजाचा विसर्जन सोहळा केवळ मिरवणूक नाही… तर भक्ती, परंपरा, ढोल-ताशांचा निनाद आणि गणरायाच्या जयघोषाने सजलेला एक भव्य सोहळा असणार आहे.

आणि सर्वात महत्त्वाची बातमी…

शहरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही? काळजी करण्याचं कारण नाही!

कारण सिटी न्यूज तुमच्यासाठी घेऊन येत आहे विदर्भाच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण!

मिरवणुकीतील ढोल-ताशांचा निनाद असो… राजकमल चौकातील महाआरती असो… हजारो भक्तांचा उत्साह असो… किंवा गणरायाला दिला जाणारा भावपूर्ण निरोप…

प्रत्येक महत्त्वाचा क्षण तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे, फक्त सिटी न्यूजवर!

तर अमरावतीच्या गणेशोत्सवाची शान असलेल्या विदर्भाच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक!

१३ ढोल-ताशा आणि वाद्य पथकांचा गजर…
राजकमल चौकातील भव्य महाआरती…
हजारो गणेशभक्तांची उपस्थिती…
मोसिकोल येथे २ हजार ५०० भाविकांसाठी विशेष आसन व्यवस्था…

आणि या संपूर्ण भक्तिमय सोहळ्याचं थेट प्रक्षेपण फक्त सिटी न्यूजवर!

📍 ठिकाण — अमरावती
📅 दिनांक — १ ऑक्टोबर
🕑 वेळ — दुपारी २ वाजल्यापासून

विदर्भाच्या राजाच्या भव्य-दिव्य विसर्जन मिरवणुकीचा प्रत्येक क्षण… पाहा फक्त सिटी न्यूजवर थेट!

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!

पाहत राहा… सिटी न्यूज!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button