citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

उमरखेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

उमरखेड | यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात ट्रॅक्टर वेल्डिंग करताना झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला आहे. ढाणकी रोडवरील बैल बाजारासमोर आज दुपारी घडलेल्या या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्लास्टिंगसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर वेल्डिंगच्या कामासाठी दुकानासमोर आणण्यात आला होता. ट्रॅक्टरवर वेल्डिंगचे काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की परिसरात मोठी खळबळ उडाली.

या दुर्घटनेत शेख शहाब आणि अविनाश बेले यांचा मृत्यू झाला. तर वैभव मिराशे, उमेर शेख यांच्यासह आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाला, ट्रॅक्टरमध्ये कोणते साहित्य किंवा घटक होते आणि वेल्डिंगच्या प्रक्रियेदरम्यान नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या भीषण दुर्घटनेमुळे वेल्डिंग आणि स्फोटक साहित्याच्या हाताळणीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र स्फोटाचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे उमरखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

उमरखेडमधील या भीषण स्फोटातील पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button