Uncategorized

कामरगावात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी वेधले लक्ष; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

कारंजा लाड : श्री क्षेत्र सिद्धिविनायकाच्या पावन भूमीत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कामरगाव येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक आणि भक्तिमय देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.विविध गणेश मंडळांकडून धार्मिक, सामाजिक तसेच पर्यावरणपूरक संदेश देणारे नयनरम्य देखावे साकारण्यात आले आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई, प्रसन्न गणेशमूर्ती आणि देखण्या सजावटीमुळे हे देखावे नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.धूप-दीपांचा सुगंध, मंत्रोच्चारांचा मंजुळ निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण कामरगाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. कामरगावसह आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गणेश मंडळांच्या देखाव्यांना भेट देत असून, बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी होत आहे.भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या विघ्नहर्त्याच्या दर्शनासोबतच आकर्षक देखावे आणि उत्साहपूर्ण वातावरणाचा आनंद नागरिक घेत आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कामरगावकरांसाठी विशेष आकर्षणाचा ठरत असून, संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button