citynewsNanded

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये रास्ता रोको

पिंपळगाव महादेव पाटीजवळ मराठा समाजाचे आंदोलन; नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पिंपळगाव महादेव पाटीजवळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे शेकडो बांधव रस्त्यावर उतरले आहेत. पिंपळगाव महादेव पाटीजवळ नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जवळपास तासभरापासून महामार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलकांनी सरकारला धारेवर धरत, विदर्भात मराठा आरक्षण लागू होऊ शकते, तर संपूर्ण महाराष्ट्रात ते का लागू होत नाही, असा सवाल उपस्थित केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महामार्ग रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, सरकारने आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button