citynewsNanded

जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये रास्ता रोको; ४ सप्टेंबरला जिल्हा बंदची हाक

सकल मराठा समाज आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ४ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात विविध मराठा संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून, मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात नांदेड जिल्ह्यात आंदोलनाची दिशा काय राहणार आणि प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button