citynewsDelhiLatest NewsMaharashtrapolitics

शरद पवार–पंतप्रधान मोदी भेटीवर अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांवरील कारवाईचा मुद्दा बैठकीत मांडला जाईल, असा विश्वास; पोलिस चौकशी आणि विद्यार्थ्यांची सुटका करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित भेटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित मुद्द्यांवर अभिजीत दिपके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपके म्हणाले, “आज शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीत ते आमच्या मुद्यावर नक्कीच भाष्य करतील. ज्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्या घटनेची चौकशी व्हावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांची मुक्तता करण्यात यावी.”

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगत, “सुप्रियाताईंशी चर्चा झाली होती. त्या आमच्या भूमिकेसोबत आहेत,” असेही नमूद केले.

दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या चर्चेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेतली जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button