AmravatiAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

राजापेठ मित्र मंडळात नव्या कार्यकारिणीचा व अतुल कोटेचा यांचा सत्कार

मणिबाई गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील राजापेठ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भव्य सत्कार समारंभात मणिबाई गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा तसेच नागपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक आणि अमरावतीचे सुपुत्र अतुल कोटेचा यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला.

राजापेठ येथील राज रेस्त्राँ येथे आयोजित कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड झालेल्या सीए निलेश लाठिया यांच्यासह मणिबाई गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या संपूर्ण नवनिर्वाचित कार्यकारिणीचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याचवेळी नागपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झालेल्या अतुल कोटेचा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला अमृत मुथा, मन्नुभाऊ गांधी, डॉ. चंदू सोजतिया, अनिल बोथरा, अनिल मुणोत, संजय मुणोत, अभय कोटेचा, अॅड. विजय बोथरा, गौरव लुनावत, धर्मेंद्र मुणोत, सुरेश जैन, रतन भंसाली, चेतन कोटेचा, नरेश कंठालिया, सुरेश साबू, भारत खजांची, सुभाष भंडारी, संजय आंचलिया, अशोक बंबोरिया, जिनेश गुगलिया आणि डॉ. गोविंद कासट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी राजापेठ मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही प्रेरणादायी परंपरा असल्याचे मत व्यक्त केले. नव्या कार्यकारिणीला तसेच अतुल कोटेचा यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

राजापेठ मित्र मंडळाच्या या सत्कार समारंभातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. समाजातील सकारात्मक कार्याला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button