AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीत अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा धडक प्रहार

तीन वाहने, ११ ब्रास रेतीसह ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; आठ जणांवर गुन्हे

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ४५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परतवाडा आणि शेघाट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तीन वाहने आणि सुमारे ११ ब्रास रेती जप्त करण्यात आली असून, आठ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेती वाहतुकीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. गोपनीय माहितीच्या आधारे परतवाडा येथील कैकाडीपुरा रोडवर छापा टाकून रेतीने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करण्यात आली. या कारवाईत ५ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यानंतर शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसला टोल प्लाझा परिसरात दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान रेतीने भरलेले दोन हायवा ताब्यात घेण्यात आले. दोन्ही कारवायांमध्ये प्रत्येकी २० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तीनही कारवायांमध्ये मिळून सुमारे ११ ब्रास रेती, एक ट्रॅक्टर-ट्रॉली आणि दोन हायवा असा एकूण ४५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास परतवाडा आणि शेघाट पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button