नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत राहणाऱ्या तरुणाला अटक; मेडिकल तपासणीत प्रकरण उघड

नागपुरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीसोबत राहत असल्याचा आरोप असलेल्या तरुणाला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. गर्भधारणेनंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्याने हे संपूर्ण प्रकरण उघड झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने सतरावर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. त्यानंतर दोघे नंदनवन परिसरात एकत्र राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पीडित मुलगी गर्भवती झाल्यानंतर आरोपी तिला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेला. मात्र तपासणीदरम्यान आधार कार्डवरील माहितीतून संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे उघड झाले.
यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी अक्षय याला ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलांशी संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया अत्यंत कठोर असते. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज.



