AmravaticitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अमरावतीत प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र; इतवारा बाजारात २२ दुकानांची तपासणी, ₹१२ हजारांचा दंड

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेने प्लास्टिकमुक्त शहर अभियानाला गती देत इतवारा बाजार परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत २२ आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली असून, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि डस्टबिन नसल्यामुळे एकूण १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

१८ मे रोजी विशेष मोहीम

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निर्देशानुसार, उत्तर झोन क्रमांक १ अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील इतवारा बाजारात १८ मे २०२६ रोजी ही मोहीम राबवण्यात आली.

स्वच्छता विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दुकानदारांची तपासणी केली.

प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्याबद्दल कारवाई

तपासणीदरम्यान पवन किराणा या आस्थापनात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळून आल्याने त्यांच्यावर ₹५,००० दंड आकारण्यात आला.

डस्टबिन नसल्याने सात दुकानदारांवर दंड

डस्टबिन न ठेवणाऱ्या खालील दुकानदारांवर प्रत्येकी ₹१,००० दंड ठोठावण्यात आला:

  • व्यंकटेश तेल भंडार
  • प्रविण साहू
  • जय बजरंग स्वीट मार्ट
  • राजू नमकीन
  • शिवाणी स्वीट मार्ट
  • पटेरिया स्वीट मार्ट
  • हेमराज साहू

अधिकाऱ्यांचा सहभाग

या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, सचिन सैनी, मेघराज ढेनवाल, निखिल खंगाळे, एम. सैय्यद, शाहू जवंजाळ, अनिकेत महल्ले आणि आशिष सहारे यांनी सहभाग घेतला.

मनपाचे आवाहन

महानगरपालिकेने “स्वच्छ शहर – सुंदर शहर” या संकल्पनेअंतर्गत नागरिक आणि व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आणि प्रत्येक आस्थापनात डस्टबिन ठेवण्याचे आवाहन केले आहे.

पुढील काळात कारवाई आणखी तीव्र होणार

मनपाने स्पष्ट केले आहे की, प्लास्टिकमुक्त शहरासाठी अशा तपासण्या पुढेही नियमितपणे सुरू राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button