AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

महादेवखोरी मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांकडून नृत्य-नाटिकेतून फुले-आंबेडकरांना मानवंदना; शाळा प्रवेशासाठी जनतेला आवाहन

महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त मनपा उच्च प्राथमिक शाळा, महादेवखोरीच्या विद्यार्थ्यांनी भिमटेकडी येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रभावी नृत्य-नाटिकेच्या माध्यमातून महामानवांना मानवंदना दिली.

“सावित्री ज्योतीचा संघर्ष” या नृत्य-नाटिकेचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या सादरीकरणातून क्रांतीबा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व संघर्षाचा प्रभावी आढावा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने आणि नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी महानगरपालिका शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सुविधा, गुणवत्तापूर्ण आणि मोफत शिक्षणाची माहिती देत नागरिकांनी आपल्या मुलांचा प्रवेश मनपा शाळांमध्ये घ्यावा, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाला बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर तसेच बौद्ध धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

या नृत्य आणि नाटिकेसाठी ज्योती बनसोड, शाळा निरीक्षक तथा मुख्याध्यापक, मनपा शिक्षण विभाग, अमरावती तसेच प्रज्ञा ढंगारे मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ढोणे ताई, चवरे ताई, ठाकरे ताई, सोळंके ताई, कुर्वे ताई, दुकले मॅडम, सराड सर, घोरमाडे ताई तसेच सर्व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेली ही नृत्य-नाटिका केवळ मनोरंजन नव्हे, तर समाजप्रबोधनाचा संदेश देणारी ठरली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button