Amaravti GraminAmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

परतवाडा व्हिडिओ प्रकरणात अल्पसंख्यांक आयोगाची एंट्री; विशेष पथक अमरावतीत दाखल

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या गंभीर घटनेची राज्य अल्पसंख्यांक आयोगाने दखल घेतली असून, आयोगाचे विशेष पथक आज अमरावतीत दाखल झाले आहे.

आयोगाच्या सदस्यांनी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला. आतापर्यंतच्या तपासाची माहिती, अटक करण्यात आलेले आरोपी, व्हायरल झालेल्या व्हिडिओंची संख्या आणि पीडित तरुणींच्या सुरक्षेबाबत पोलिसांकडून माहिती घेण्यात आली.

या प्रकरणात पीडितांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आयोग आता सक्रिय झाला आहे. आयोगाच्या पथकाने संबंधित अधिकाऱ्यांना तपास जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना महिला व बालकल्याण विकास अधिकारी तथा अल्पसंख्यांक समितीचे सदस्य मुस्ताक खान पठाण यांनी सांगितले की, “हे प्रकरण अत्यंत गंभीर असून कोणत्याही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. पीडित तरुणींना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबद्ध आहे.”

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून आरोपींचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट्स आणि संपर्कांची सखोल चौकशी सुरू आहे. जिल्हाभरात या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button