Uncategorized

अमरावतीत वाहनांचा स्फोट! ५ वर्षांत २.४६ लाखांची वाढ

अमरावतीकरांनो, गेल्या काही वर्षांत तुमच्या घरात एक नव्हे तर दोन-दोन वाहने आली आहेत का? कारण आकडे सांगतात एक वेगळीच गोष्ट!
अमरावती जिल्ह्यात अवघ्या पाच वर्षांत तब्बल २ लाख ४६ हजार नव्या वाहनांची भर पडली आहे…
म्हणजेच रस्त्यावरची गर्दी वाढणारच! नेमकी काय आहे ही आकडेवारी?
“अमरावती जिल्हा वेगाने बदलतोय… आणि हा बदल दिसतोय थेट रस्त्यावर!
मार्च २०२१ मध्ये जिल्ह्यात ८ लाख ३७ हजार ७७३ वाहने होती…
आणि आता मार्च २०२६ अखेर हा आकडा पोहोचला आहे तब्बल १० लाख ८४ हजार २५० वर!
म्हणजेच… अवघ्या ५ वर्षांत २ लाख ४६ हजार ४७७ नव्या वाहनांची भर!
यात सर्वात मोठा वाटा कोणाचा?
तर दुचाकींचा! १ लाख ९० हजारांपेक्षा जास्त नवीन दुचाकी रस्त्यावर आल्या आहेत.
चारचाकी गाड्यांमध्येही मोठी वाढ…
तर ट्रॅक्टर, ट्रक, ऑटो, ई-रिक्षा यांचाही सहभाग वाढलाय.
विशेष म्हणजे…
गेल्या दोन वर्षांत वाहन खरेदीचा वेग झपाट्याने वाढला आहे!
२०२५-२६ मध्येच
५७ हजारांपेक्षा जास्त नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे.
आणि आता एक नवीन ट्रेंड…
इलेक्ट्रिक वाहनांचा!
१२ हजारांहून अधिक ई-बाईक,
५५० पेक्षा जास्त ई-रिक्षा,
आणि शेकडो ई-डिलिव्हरी व्हॅन रस्त्यावर आल्या आहेत.
म्हणजेच… वाहनवाढ ही विकासाची खूण असली तरी…
रस्त्यांवरील ताणही तितकाच वाढतोय!
आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांचं स्पष्ट म्हणणं आहे –
वाहन चालवताना नियम पाळा, हेल्मेट वापरा आणि वेगावर नियंत्रण ठेवा!
कारण… वाहन वाढणं ही प्रगती आहे… पण सुरक्षितता ही जबाबदारी आहे!”
“तर अमरावतीत वाहनांची संख्या झपाट्याने वाढतेय…
पण त्यासोबतच वाहतूक शिस्त पाळणंही तितकंच गरजेचं आहे.
तुमच्या शहरात किती वाहने आहेत?
आणि ट्रॅफिकची परिस्थिती कशी आहे?

अमरावती जिल्ह्यात गेल्या ५ वर्षांत वाहनसंख्येत मोठी वाढ झाली आहे. २०२१ ते २०२६ दरम्यान तब्बल २.४६ लाख नव्या वाहनांची भर पडली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button