Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांची रेलचेल! १४ एप्रिलला ऐतिहासिक सोहळा

अमरावती शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समिती, अमरावती यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत
👉 सामूहिक अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
👉 “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव, जीवन संघर्ष व कर्तव्यपूर्ती पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहेत

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे प्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते संजय आवटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान.
👉 विषय: “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत संविधानाची ७५ वर्षे”

या कार्यक्रमाची माहिती आयोजक समितीने पत्रकार परिषदेत दिली असून, शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विचारांना चालना देणारा, प्रेरणा देणारा आणि समाजाला दिशा देणारा हा सोहळा ठरणार आहे.

📍 १४ एप्रिल | ⏰ सकाळी ९:३० वाजता
📌 स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अमरावती

📺 या भव्य सोहळ्याचा भाग व्हा… पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button