BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

सिनेस्टाईल पाठलाग करून अड्याळ पोलिसांची मोठी कारवाई; १४ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

भंडारा : अड्याळ पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखू तस्करीवर मोठा घाव घालत सिनेस्टाईल पाठलाग करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिलच्या सायंकाळी किटाळी फाटा येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी ‘फोर्स वन’ गाडीला थांबवण्याचा इशारा देण्यात आला. मात्र चालकाने पोलिसांचे आदेश धुडकावून लावत वाहन भरधाव वेगात पळवले.

यावेळी अड्याळ पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू करत सुमारे ५०० मीटरपर्यंत त्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग केला. अखेर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून चावी घेऊन जंगलाच्या दिशेने पळ काढला. अंधाराचा फायदा घेत तो फरार होण्यात यशस्वी झाला.

यानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. वाहनाची चावी उपलब्ध नसल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने गाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

या कारवाईत एकूण १४ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फरार आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.

ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – City News

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button