AmravatiHelth CareLatest News

प्रभाग 20 नगरसेविका संतप्त, 8 दिवसात स्वच्छता नाही तर आंदोलन

प्रभाग क्रमांक २० मधील सूतगिरणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरसेविका सुमती ढोके यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कोर्णांक कंपनीला स्वच्छतेचा ठेका दिल्यापासून परिसरात स्वच्छतेची स्थिती अधिकच बिघडली आहे, नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या खाजगी जागेत घुसत आहे, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.

याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरसेविका सुमती ढोके यांनी प्रशासनाला आणि संबंधित कंपनीला इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की जर ८ दिवसांच्या आत प्रभाग स्वच्छ करण्यात आला नाही तर त्या तीव्र आंदोलन छेडतील.
आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button