AmravatiLatest NewsMaharashtra Politics

मतदार यादीत मोठा बदल? भाजपाची अमरावतीत SIR कार्यशाळा!

महाराष्ट्रात सध्या एक मोठी प्रक्रिया सुरू आहे, जी थेट तुमच्या मतदार ओळखीशी जोडलेली आहे. SIR म्हणजेच मतदार यादी पुनर्मूल्यांकन आणि याच विषयावर आता अमरावतीत भाजपाने मोठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात SIR म्हणजेच मतदार यादी पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील नावे तपासली जाणार आहेत. नवीन नोंदी, चुकीची माहिती आणि डुप्लिकेट नावे यावर विशेष लक्ष दिलं जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा भाजपाच्या वतीने एक विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी होणाऱ्या या कार्यशाळेला भाजप नेते आणि या विषयाचे संयोजक किरीट सौमय्या यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच कार्यशाळा प्रमुख म्हणून नितीन भुतडा यांची उपस्थितीही महत्त्वाची ठरणार आहे.

या कार्यशाळेमध्ये SIR प्रक्रियेची सविस्तर माहिती त्याचे नियम आणि कार्यकर्त्यांनी काय भूमिका घ्यावी यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे.
अमरावतीतील अभियंता भवन, शेगाव नाका येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर मतदार यादीतील तुमचं नाव अचूक आहे का? याची खात्री करण्यासाठी SIR प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे आणि अशा कार्यशाळांमधून कार्यकर्त्यांना मिळणारे मार्गदर्शनही तितकंच आवश्यक आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button