नांदेडमध्ये राजकीय वाद चिघळला! चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर जोरदार हल्ला; ‘दादांचे जोडे उचलायचे’ वक्तव्य गाजलं

नांदेड | प्रतिनिधी
नांदेडमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून खासदार अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जुना मोंढा टॉवरवरील बंद पडलेल्या घड्याळाच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळून आला. या संदर्भात पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना खासदार अशोक चव्हाण यांनी “घड्याळ चालू आहे का जिल्ह्यात?” असा टोला लगावला होता.
या वक्तव्याचा समाचार घेत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात चव्हाणांवर जोरदार निशाणा साधला.
ते म्हणाले,
👉 “काम पडलं की दादांचे जोडे उचलायचे आणि त्यांच्या जाण्यानंतर टीका करायची, ही भूमिका जनतेला मान्य नाही.”
👉 “भान न ठेवता केलेली वक्तव्ये लोकांना अजिबात रुचत नाहीत.”
👉 “घड्याळाची टिक-टिक बंद करणारा नांदेडच सोडा, महाराष्ट्रात कोणी पैदा झालेला नाही,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
चिखलीकरांच्या या वक्तव्यानंतर नांदेडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होत असून पुढे या वादाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



