AmravatiLatest NewsMaharashtra Politics

आकाशवाणीवर आ. संजय खोडके यांची अर्थसंकल्पावर मुलाखत

अमरावती आकाशवाणी केंद्रात २६ मार्च २०२६ रोजी एक विशेष आणि उत्साहवर्धक वातावरण पाहायला मिळालं… स्थानिक आमदार संजय भाऊ खोडके यांनी केंद्राला सदिच्छा भेट दिली… या भेटीदरम्यान केंद्रप्रमुख भैय्यालाल टेकाम, कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रतिनिधी गणेश देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले… यानंतर कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी आमदार खोडके यांची सखोल मुलाखत घेतली… या मुलाखतीत राज्याच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींवर चर्चा करण्यात आली… आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन, शेती आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये अमरावतीसाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला… विशेषतः विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते, यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली… अमरावतीच्या विकासाचा दीर्घकालीन रोडमॅप सादर करताना, शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलसंधारण आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला… यावेळी त्यांनी आकाशवाणी केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्याची माहिती घेतली.. हि मुलाखत आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम प्रमुख भैय्यालाल टेकाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.… यावेळी अभियांत्रिकी विभागाचे नितीन दातीर, बाळासाहेब दिघडे, गुड्डू राठी, अनिल गोएनका, आकाशवाणी निवेदक अजय घरडे यांच्यासह आकाश अटलकर, जीवन माहुरे आणि श्रीहरी दिघडेआदी उपस्थित होते.… ही विशेष मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार असून, पहिला भाग ४ एप्रिल आणि दुसरा भाग ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रसारित होणार आहे… ही मुलाखत एफएम १०१.५ मेगाहर्ट्झवर आणि ‘न्यूज ऑन एअर’ मोबाईल अ‍ॅपवरही उपलब्ध असणार आहे. आमदार संजय खोडके यांची ही विशेष मुलाखत अमरावतीच्या विकासाचा आराखडा समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button