City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये चहावाल्याकडून ४० हजारांची रंगदारी; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर शहरात रंगदारीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, चहाच्या दुकानातून उपजीविका करणाऱ्या एका दुकानदाराकडून दरमहा ४० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.

ही घटना पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. तक्रारदार मोहम्मद तौसिफ शब्बीर अली (वय ४२) हे अशोक नगर परिसरात चहाचे दुकान चालवतात.

मिळालेल्या माहितीनुसार, तौसिफ अली हे घराबाहेर उभे असताना आरोपी शफिक अंसारी आणि स्नेहल तिरपुडे तेथे आले. दोघेही आरोपी अनेकदा मद्यधुंद अवस्थेत परिसरात वाद घालत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

घटनेच्या वेळी आरोपींनी तौसिफ यांच्यावर दबाव टाकत त्यांच्या मित्राने दिलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर चहाची टपरी चालवायची असेल तर दरमहा ४० हजार रुपये द्यावे लागतील, अशी रंगदारीची मागणी करण्यात आली.

या प्रकरणी तक्रारीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button