विद्यापीठात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचा ‘शहीद दिन’ संपन्न

अमरावती – (23.03.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळण्यात आला. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य युध्दातील योध्दा तसेच थोर क्रांतीकारक भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांचा शहीद दिन विद्यापीठात संपन्न झाला. याप्रसंगी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तथा प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करून विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. शहीद भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्याबद्दल विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी माहिती दिली. शहीद दिन कार्यक्रमाला आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, कार्यकारी अभियंता श्री शशीकांत रोडे, उपकुलसचिव (आस्थापना) श्री मंगेश वरखेडे, उपकुलसचिव (मा.क.) डॉ. दादाराव चव्हाण, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



