citynewsIndia NewsLatest Newspolitics

यूपी निवडणुकीपूर्वी अखिलेश यादव यांची मोठी घोषणा; महिलांना ४० हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन

उत्तर प्रदेश मधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष प्रमुख अखिलेश यादव यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास राज्यातील महिलांना ४० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यादव यांनी ‘पीडीए’ संकल्पनेत ‘ए’ म्हणजे ‘आधी आबादी’ (महिला वर्ग) असल्याचे स्पष्ट करत महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘स्त्री सन्मान-समृद्धी योजना’ राबविण्याची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून मुली, युवती आणि महिलांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.

सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांनी आपल्या पत्नी व खासदार डिंपल यादव यांच्यासह अग्रणी महिलांसोबतचे फोटो शेअर केले. महिलांच्या हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठी आपली वचनबद्धता कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, पूर्वीची ‘समाजवादी पेन्शन’ योजना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन देत महिलांची आर्थिक ताकद वाढवण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

या घोषणेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, निवडणुकीपूर्वी महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button