Accident NewsLatest NewsPune

पुणे खेड तालुक्यात भीषण आग; 4 घरे जळून खाक, जनावरांचा होरपळून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट परिसरातील अहिरे आदिवासी ठाकरवाडीत भीषण आगीची घटना घडली असून संपूर्ण वस्ती हादरली आहे. अचानक लागलेल्या आगीत चार घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.

या आगीत आदिवासी समाजातील सोपान केदारी यांचे घर पूर्णतः नष्ट झाले असून, त्यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासोबतच दोन पडव्या आणि एकूण चार घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आगीच्या तडाख्यात 5 ते 6 शेळ्या, करड तसेच गाईचे वासरू होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी पीडित कुटुंबांना तात्काळ मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button