BusinessIndia NewsLatest News

सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! १० तोळ्यांमध्ये तब्बल ९,८०० रुपयांची घसरण; ग्राहकांना दिलासा

सराफा बाजार उघडताच आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः इराण-इस्राइल तणावामुळे सोन्याच्या किंमती वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या एका तोळा सोन्याच्या किंमतीत ९८० रुपयांनी घसरण झाली असून आता एक तोळा सोन्यासाठी १,६३,५३० रुपये मोजावे लागत आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ९,८०० रुपयांची घसरण झाली असून आज १० तोळा सोन्यासाठी १६,३५,३०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

२२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटच्या एका तोळा सोन्याच्या किंमतीत ९०० रुपयांची घट झाली असून आज एक तोळा सोनं १,४९,९०० रुपयांना मिळत आहे. तर १० तोळा सोन्यासाठी आज १४,९९,००० रुपये खर्च करावे लागणार असून या दरात ९,००० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे.

यासोबतच १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. १८ कॅरेटच्या एका तोळा सोन्याच्या किंमतीत ७३० रुपयांची घट झाली असून आज एक तोळा सोन्यासाठी १,२७,२६५ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १० तोळा सोन्याच्या दरात ७,३०० रुपयांची घसरण झाली असून १० तोळा सोन्यासाठी आज १२,७२,६५० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

सलग तीन दिवस सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे लग्नसराईच्या हंगामात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. सराफा बाजारातही ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button