Latest NewsMaharashtra

मास्टर ब्लास्टरच्या घरी लग्नसोहळा; अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात, मुंबईत पार पडला खासगी सोहळा

क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गुरुवारी (५ मार्च) विवाहबंधनात अडकला. अर्जुन आणि सानिया यांचा लग्नसोहळा मुंबईत अत्यंत खासगी आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला.

लग्नाआधी सकाळपासूनच विविध पारंपरिक विधींना सुरुवात झाली होती. त्याआधी अर्जुनचा मेहंदी समारंभ महालक्ष्मी रेसकोर्समध्ये येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला क्रिकेट आणि राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

मेहंदी कार्यक्रमात रवी शास्त्री, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि अजित आगरकर यांसारख्या अनेक क्रिकेट दिग्गजांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, लग्नसोहळा अत्यंत खासगी ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी फक्त कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींनाच निमंत्रण देण्यात आले होते. लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले असून ते सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

क्रिकेटविश्वातील दिग्गज सचिन तेंडुलकर यांच्या घरी झालेल्या या सोहळ्याची चर्चा सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button