AmravatiLatest NewsSocial News

गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन

खामगाव :- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक ग्राम दिवठाणा ता. खामगाव येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. उद्घाटन समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशन, खामगाव येथील पी.एस.आय. मा. राधा इनकर उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. धनंजय तळवणकर होते. यावेळी दिवठाणा गावच्या सरपंच मा. सौ. रेखाताई गोपाल हेलोडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कु. सुनंदा तेजस भगत, माजी पोलीस पाटील मा. श्री. साहेबराव पाटील, ‘लोकमत’चे पत्रकार मा. श्री. अनिल मुंडे तसेच ‘खामगाव वार्ता’चे पत्रकार श्री. मुकेश हेलोडे, महिला कार्यक्रमाधिकारी मा. डॉ. नीता बोचे, सह कार्यक्रमाधिकारी प्रा. उमेश खंदारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी केली. त्यांनी शिबिराच्या सात दिवसांच्या उपक्रमांची रूपरेषा मांडून शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रमुख अतिथी मा. राधा इनकर यांनी शिबिराचे उद्घाटन झाल्याचे घोषित करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर मार्गदर्शन व शासकीय सेवांतील संधी याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मविश्वास, शिस्त व परिश्रम यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तळवणकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट, शाश्वत विकासासाठी युवा पाणलोट व्यवस्थापन व पडीक जमीन विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. श्रमदानातून सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्व विकास कसा घडतो, हे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रा. ठेंग सर, सिडाम सर, काकडे सर, खेडकर मॅडम, श्री. गोपाल हेलोडे, श्री. सारंगधर वाकुडकर, श्री. रघुनाथ वाकुडकर, श्री. विश्वंभर वाकुडकर, श्री. अनंता राखोंडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. दादासाहेब बोबडे, उपाध्यक्ष प्रकाशजी तांबट, तसेच सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कु. शितल तायडे हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. दीक्षा खोडे हिने केले. या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये विविध सामाजिक उपक्रम, श्रमदान, जनजागृती कार्यक्रम व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button