AmravatiLatest NewsSports

संकल्प दौडमध्ये शेकडो शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांचा सहभाग

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे आयोजन

 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती व विवेकानंद ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित संकल्प दौडमध्ये अमरावती शहरातील शेकडो शालेय व महाविद्यालयीन विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला.
               प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी व मुंबई येथील स्वामी विवेकानंद तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक, समाजसेविका श्रीमती श्रध्दा व्यास यांनी हिरवी झेंडी दाखवून संकल्प दौडची विवेकानंद कॉलनी येथून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही संकल्प दौड रुख्मिणीनगर, काँग्रेसनगर मार्गे प्रशांतनगर येथील बगिचाजवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला हारार्पण करुन संकल्प दौडचा समारोप करण्यात आला. प्रारंभी स्वामी विवेकानंद कॉलनी येथील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हारार्पण करण्यात आले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र कडू, विवेकानंद ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. अमरसिंह राठोड, श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीचे अध्यक्ष श्री हरिहर जिराफे, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. योगे·ार कुरवाडे, गणमान्य नागरिक मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button