AmravatielectionLatest News

सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंद; दुपारनंतर वाढीची शक्यता

अमरावती, दि. — :
जिल्ह्यात आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या सत्रात संथ प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. सकाळी 9.30 वाजेपर्यंत विविध तालुका व नगरपरिषद क्षेत्रांत मतदानाची टक्केवारी मर्यादित राहिली आहे.

अमरावती शहरात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 9.92 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. अंजनगाव सुर्जी येथे 10.53 टक्के मतदान झाले असून, दर्यापूर तालुक्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत 11.32 टक्के मतदान झाले आहे. वरुड येथे 9.79 टक्के, तर आदिवासी बहुल धारणी तालुक्यात केवळ 7.23 टक्के मतदान झाले आहे. अचलपूर नगरपरिषद क्षेत्रातही सकाळी 7 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

सकाळच्या सत्रात काही शहर व तालुक्यांमध्ये मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी दिसून आला. मात्र, सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही.

उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतर आणि दुपारच्या सत्रात मतदारांचा उत्साह वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button