मालेगाव तालुका अध्यक्षपदी महंत पवनदास महाराज यांची नियुक्ती

मालेगाव: हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या मालेगाव तालुका अध्यक्षपदी मालेगाव येथील संत गुणवंत बाबा भेरा दरबारचे महंत पवनदास महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंदू सुरक्षा सेवा संघ ही भारतभर हिंदू धर्माचे रक्षण आणि प्रचार करण्यासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री 1008 महंत राजुदास महाराज, सिद्ध पीठ हनुमान गडी, आयोध्या यांच्या मार्गदर्शनाखाली, संपूर्ण भारतात संघटनेचे जाळे पसरवून हिंदू धर्माच्या रक्षणासह धर्माचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहेत.
महंत पवनदास महाराज यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष श्री 1008 राजुदास महाराज यांनी अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे केली आहे. पवनदास महाराज म्हणाले की, त्यांनी मालेगाव तालुक्यात हिंदू धर्माचे रक्षण, गोरक्षण, गोसेवा तसेच सनातन धर्माचा प्रचार करण्याचे काम यशस्वीपणे पार पाडण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.
या नियुक्तीवर स्थानिक स्तरावर आणि धर्मप्रेमींमध्ये सर्वत्र अभिनंदन व्यक्त केले जात आहे.



