Latest NewsMaharashtra
मोदींचा इशारा: “हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही

राजधानी दिल्लीतील लाल किल्लाजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, शेगाव आणि कोकण किनारपट्टीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मोदींचा इशारा: “भ्याड हल्ला, दोषींना सोडणार नाही”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याला भ्याड कृत्य ठरवत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
“एकालाही सोडणार नाही. रात्रभर यंत्रणेकडून माहिती घेतली असून सर्व संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत,” — पंतप्रधान मोदी
अपडेट्सनुसार प्रमुख घडामोडी:
- मृतांची संख्या 13 वर पोहोचली असून चार ते पाच मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
- उमरचे दोन भाऊ पोलिसांच्या ताब्यात, त्यांच्याकडून 18 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
- लाल किल्ल्याजवळील स्फोटक कारचा तपास सुरू असून प्राथमिक अहवालानुसार हा आयईडी स्फोट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



