Latest NewsMaharashtra

दिल्ली स्फोटानंतर लाल किल्ला 3 दिवसांसाठी बंद, देशभरात हाय-अलर्ट

दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर राजधानीत तणावाचं वातावरण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लाल किल्ला पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईसह देशभरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे वारे वाहत आहेत. 11 नोव्हेंबरनंतर राज आणि उद्धव ठाकरे युती जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी कारवाई
फरिदाबादमध्ये डॉ. शाहीन शाहिदला अटक करण्यात आली आहे. ती जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखा ‘जमात-उल-मोमिनत’साठी भरतीचे काम पाहत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या शाखेचे भारतातील कमांड तिच्याकडे होते. सादिया अझहर — मसूद अझहरची बहीण — पाकिस्तानमध्ये या महिला शाखेची प्रमुख आहे, तर तिचा पती युसूफ अझहर हा कंधार अपहरण प्रकरणातील सूत्रधार होता.


गुप्तचर तपासात नवे तपशील
स्फोटात वापरलेली i20 कार 10 नोव्हेंबरच्या सकाळी 8.13 वाजता बदरपूर टोल बूथ पार करून दिल्लीत आली. त्यानंतर ती 8.20 वाजता ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील पेट्रोल पंपावर दिसली. दुपारी 3.19 वाजता ती लाल किल्ला संकुलाजवळील पार्किंग क्षेत्रात आली होती, आणि सायंकाळी 6 वाजता तेथून बाहेर पडल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.


पुणे महापालिका आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू
पुणे महापालिकेतील 41 प्रभाग आणि 165 सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत सुरू झाली आहे. महिलांसाठी 83 आणि पुरुषांसाठी 82 जागा राखीव आहेत. महिलांसाठी खुला प्रवर्ग 48, ओबीसी 23, एससी 11 आणि एसटी 1 जागा आहेत. तर पुरुषांसाठी खुला प्रवर्ग 48, ओबीसी 22, एससी 11 आणि एसटी 1 जागा आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button