India NewsLatest NewsMaharashtra

दिल्ली लाल किल्ला स्फोट: स्फोटात वापरलेल्या कारचं पुलवामा कनेक्शन उघड

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानं संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात वापरलेल्या ह्युंदाई i20 कारचं पुलवामाशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. कारचा रजिस्ट्रेशन नंबर HR 26 CF 7674 असून ती हरियाण्यातील असल्याचं तपासात आढळलं आहे.

ही कार अनेक वेळा विक्री आणि खरेदी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सुरुवातीला कार गुरुग्राममधील मोहम्मद सलमान यांच्या नावावर होती. त्यानं ही कार ओखलामध्ये नदीम नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यानंतर कारचा व्यवहार फरिदाबादमध्ये झाला आणि शेवटी ती पुलवामा येथे विकण्यात आली.

शेवटच्या व्यवहारात कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव तारिक असल्याचं समोर आलं आहे. तारिक हा पुलवामाचा रहिवासी आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून तारिक आणि स्फोटाशी संबंधित इतर सर्व संशयितांचा तपास सुरू आहे.

या प्रकरणातील सर्व धागेदोरे तपास यंत्रणांकडून बारकाईनं पडताळले जात असून, या स्फोटामागील मुख्य सूत्रधार कोण हे शोधण्याचं काम वेगानं सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button