AmravatiLatest News

विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा


   संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात आंतरराष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक व डॉ. किशोर राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
               अध्यक्षीय भाषणात डॉ. नायक यांनी बालिकांचे सामाजिक स्थान व सबलीकरणाच्या गरजा तसेच बालिका भविष्यातील सक्षम नागरिक आहे, तिच्या शिक्षण, आरोग्य व संधींच्या समानतेकडे समाजाने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे सांगितले. डॉ. किशोर राऊत यांनी  समाजात बालिकेची भूमिका आणि आव्हाने या विषयावर आपले विचार मांडतांना बालिका ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर समाजाच्या विकासाची शिल्पकार आहे. तिच्या क्षमतेला योग्य दिशा दिल्यास राष्ट्र उभारी घेईल, असे सांगितले. यावेळी विभागातील विद्याथ्र्यांनीही मनोगत व्यक्त केले. कु.गायत्री खरबडे हिने स्वलिखित निबंधाचे वाचन केले, तर अन्य विद्यार्थिनीनी महिलांच्या आत्मनिर्भरतेबाबत आपले मत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात  संत गाडगेबाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व विद्यापीठ गीताने झाली. सूत्रसंचालन डॉ. रोहिणी देशमुख, तर आभार प्रा. साधना इंगोले यांनी मानले. कार्यक्रमाला  डॉ. प्रशांत भगत, प्रा. सुनिता इंगळे, संशोधक विद्यार्थी श्री रमेश पवार, विभागातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button