Latest NewsMaharashtra

नेपाळमध्ये राजकीय गोंधळ – हिंसाचारात भारतीय पर्यटक अडकले

नेपाळ – नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि हिंसक निदर्शनांनी पर्यटकांचे हाल झाले आहेत. पुणे आणि मुंबईतील तब्बल २३ ज्येष्ठ नागरिक पर्यटनासाठी नेपाळला गेले असताना आता तिथे अडकले आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे सर्वजण हॉटेलमध्येच कैदेसारख्या अवस्थेत राहण्यास मजबूर आहेत. बाहेर सुरू असलेल्या आंदोलने आणि हिंसाचारामुळे ते अत्यंत भयभीत झाले आहेत. या पर्यटकांनी भारत सरकारकडे तात्काळ मदतीची आणि सुरक्षितरीत्या नेपाळमधून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांचीही चिंता वाढली असून, आता सरकार काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button