AmravatiLatest News

अमरावतीचा रेल्वे पूल होणार नव्याने दुरुस्त – सुरू होणार काम

अमरावती- अमरावतीतल्या रेल्वे पुलाला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. सेतुबंधन योजनेतून तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी या पुलाच्या दुरुस्तीसाठी मंजूर होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिले आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन अमरावतीतील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरवस्थेची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता निधी मिळाल्याने या पुलाची दुरुस्ती होऊन तो पुन्हा सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अमरावतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button