Crime NewsLatest News

डफळे हॉस्पिटलसमोर वृद्ध महिलेला नकली पोलिसांची लूट

अमरावती : आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास अतुल मंगल कार्यालयाजवळील डफळे हॉस्पिटल समोर काँग्रेस नगर येथील अरुण चांदोरे व त्यांची पत्नी कमल चांदोरे हे वृद्ध दाम्पत्य आले होते. अरुण चांदोरे यांना हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी त्यांची पत्नी कमल चांदोरे ऑटोतून उतरली आणि हॉस्पिटलच्या आत गेली.
तोपर्यंत तिथे आलेल्या तीन जणांच्या टोळीतील एका आरोपीने महिलेपाशी येऊन सांगितले की – “या परिसरात लूटपाट होऊ शकते, आपण वृद्ध आहात, म्हणून आपल्या दागिन्यांची काळजी घ्या. ते काढून रुमालात ठेवून जवळ सांभाळा.”
भाबड्या विश्वासाने कमल चांदोरे यांनी आपले सोन्याचे दागिने काढून आरोपीकडे दिलेल्या रुमालात ठेवले. महिला परत हॉस्पिटलच्या आत गेल्यावर रुमालात दागिन्यांच्या ऐवजी दगड असल्याचे दिसून आले. लगेचच महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने आरडाओरड केली.
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नर्स हर्षा यांनी ताबडतोब बाहेर धाव घेतली, मात्र आरोपींनी तेवढ्यातच पसार होण्यात यश मिळवले होते.
या बनावट पोलिसांनी कमल चांदोरे यांच्याकडून तब्बल दीड लाख रुपये किमतीचे दागिने लुटले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि एसीपी संजय खताळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे काँग्रेस नगर परिसरात खळबळ उडाली असून, वृद्धांना टार्गेट करणाऱ्या नकली पोलिसांच्या टोळीबद्दल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button