AmravatiLatest News

अर्हम ग्रुप साठी जनसेवा हीच ईशसेवा

अमरावती :- राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज प्रेरित अर्हम युवा सेवा ग्रुप च्या वतीने इमरजेंसी मेडिकल सहाय प्रकल्प अंतर्गत राम सेवा समितिच्या विशेष सहयोगाने श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावतीच्या क्रिटिकल केयर युनिट मध्ये “अत्याधुनिक वेंटिलेटर प्रदान करण्यात आलंय हे पोर्टेबल वेंटिलेटर” रुग्णाची जीवित वाचवण्यासाठी ताबडतोब सहायक आहे तसेच उपयोगी आहे .

अमरावती हि अनेक संतांची थोर पुरुषांची कर्मभूमी आहे संतांच्या आदर्शाप्रमाणे व राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज यांच्या प्रेरणेने अर्हम युवा सेवा ग्रुप काम करतोय जनसेवा हीच ईशसेवा हे अर्हम युवा सेवा ग्रुपचं ब्रीदवाक्य आहे. अर्हम युवा सेवा ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात

अमरावती जिल्ह्यातील रुग्णांसाठी लाइफ लाइन असलेल्या सुविख्यात श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतेय हि निकड लक्षात घेऊन अर्हम युवा सेवा ग्रुप ने राम सेवा समिति च्या सहयोगाने हॉस्पिटलमध्ये”अत्याधुनिक वेंटिलेटर प्रदान केलं. हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ अनिल सावरकर,सचिव प्रा सागर पासेबंद,ट्रस्टी उषाताई ठुसे ,राजेन्द्र दिगंबर,राजू मुकवाने,कार्डियोलॉजिस्ट डॉ धवल तेली,डॉ तायवडे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत अर्हम ग्रुपने महाप्रभावक श्री स्तोत्राचं स्मरण केलं. राम सेवा समिति च्या उमा केडिया यांनी वेंटिलेटर चं पूजन केलं. पुष्पहार अर्पण करून ,रुग्णांना उत्तम आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देण्यात आल्या श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल ला वेंटिलेटर अर्पण करण्यात आलं.यावेळी हॉस्पिटल चे विश्वस्त अर्हम युवा सेवा ग्रुप के प्रकल्प प्रमुख अर्हम सेवक निमिष संघाणी,अध्यक्ष विकास देसाई,भव्य धुवाविया,रितेश पारेख,रोमित पारेख, राम सेवा समिति सदस्य. उमा केडिया अर्हम सेवक राजुल देसाई, दर्शना मेहता,निकिता धुवाविया,अ दीपिका दामाणी आदि उपस्थित होत्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button