agriculturecitynewsLatest NewsMaharashtraWeather Report

सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; धान उत्पादक शेतकरी चिंतेत

शेतात कापून ठेवलेले धान आणि मळणी करून वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकाला फटका बसण्याची भीती

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काल सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागांत पावसाला सुरुवात झाली होती. सायंकाळच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

आज पुन्हा सकाळपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सध्या शेतांमध्ये धान पिकाचे कडपे कापून ठेवण्यात आले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी धानाची मळणी करून ते वाळविण्यासाठी शेतात ठेवले आहे.

अशा परिस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेले धान भिजण्याची आणि वाळविण्यासाठी ठेवलेल्या धानाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच शेतीच्या कामांमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्यांना आता पावसामुळे पिकाची काळजी घ्यावी लागत आहे.

सलग दोन दिवस सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून, पावसाचा आणखी किती काळ प्रभाव राहतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button