agricultureChandrapurcitynewsLatest NewsMaharashtraWeather Report
चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; तूर आणि कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण; रिमझिम पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता
चंद्रपूर : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळत असला, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र हा पाऊस चिंतेचा विषय ठरत आहे.
जिल्ह्यातील तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
एकीकडे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे हवेत आल्हाददायक बदल जाणवत आहे, तर दुसरीकडे शेतातील पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आता पावसाचा जोर आणि पुढील हवामान कसे राहते, याकडे लक्ष ठेवून आहेत.



