citynewsDhamangaonlatestnewss breakingnewspolitics

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या विटंबनेचा धामणगावात निषेध

युवक काँग्रेसकडून शिंदे सेना आणि महायुती सरकारविरोधात प्रतीकात्मक पुतळा दहन; यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती

धामणगाव रेल्वे, अमरावती : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘Belonging’ या आत्मचरित्राच्या पुस्तकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने धामणगाव रेल्वे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे सेना आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनातून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुस्तकाच्या विटंबनेच्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे. पुस्तकांची विटंबना करून लोकशाहीतील अभिव्यक्तीचा आवाज दाबता येणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. संबंधित नेत्यांच्या कृतीचा निषेध करत युवक काँग्रेसने या प्रकाराला लोकशाही मूल्यांच्या विरोधातील कृत्य असल्याचे म्हटले.

या आंदोलनाला माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री सुनील देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, प्रदेश महासचिव परीक्षित जगताप, नितीन काळे यांच्यासह काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या विटंबनेचा निषेध नोंदवत आंदोलकांनी पुस्तकांचा आणि वैचारिक स्वातंत्र्याचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. या आंदोलनामुळे धामणगाव रेल्वेतील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button