AmravatiAmravati Gramincitynewslatestnewss breakingnews

‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत निर्मिती पब्लिक स्कूलमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

सोशल मीडियाचा वापर करताना सावधान! ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी – सुयोग गोरले

चांदूर बाजार : डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर वाढत असताना विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. याच उद्देशाने ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत चांदूर बाजार येथील निर्मिती पब्लिक स्कूलमध्ये सायबर गुन्हे आणि विद्यार्थी जागरूकता या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि ऑनलाइन फसवणुकीच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचे धोके, मोबाईल वापरताना घ्यावयाची खबरदारी तसेच ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक असलेली सतर्कता याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इंटरनेटचा वापर करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये. ऑनलाइन मिळणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि प्रलोभनांना बळी पडू नये. वैयक्तिक माहिती, पासवर्ड आणि गोपनीय तपशील कोणासोबतही शेअर करू नयेत, असे आवाहन ठाणेदार सोनवणे यांनी केले. सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांची मदत घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक तुषार खोंड, उपमुख्याध्यापक अजीम सौदागर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देऊन सुरक्षित डिजिटल वापराची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button