citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

तडीपार असूनही नागपुरात भाड्याच्या घरात मुक्काम; गुन्हे शाखेच्या जाळ्यात शुभम उर्फ लिंबू!

वाठोडा परिसरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ची कारवाई; २१७ ग्रॅम गांजा, तलवार, वजनकाटा आणि मोबाईलसह २४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : तडीपार असतानाही नागपूर शहरात वास्तव्य करून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. शुभम उर्फ लिंबू गजानन लिंबूडकर (वय २७, रा. विजयनगर, पाख्खीडे लेआऊट, प्लॉट क्रमांक ६२, हिंगणा रोड, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या भाड्याच्या घराची झडती घेतली असता २१७ ग्रॅम गांजा, एक तलवार, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि मोबाईलसह एकूण २४ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी शुभम लिंबूडकर हा तडीपार असतानाही वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगर परिसरात भाड्याच्या घरात राहत आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली असता आरोपी तेथे आढळून आला.

घराच्या झडतीत गांजा आणि तलवार जप्त

आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता पोलिसांना २१७ ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत १० हजार ८५० रुपये), प्लास्टिक रॅपरचे एक पॅकेट, इलेक्ट्रिक वजनकाटा, एक तलवार आणि रेडमी नोट ९ मोबाईल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत २४ हजार १५० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात होता फरार

शुभम लिंबूडकर हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्रमांक ५७४/२०२६ मधील फरार आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. तडीपार असतानाही तो शहरात वास्तव्य करीत असल्याचे या कारवाईतून समोर आले.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने आरोपीला जप्त मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाठोडा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. या कारवाईमुळे तडीपार आरोपींच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button